Abhang 7
वाळो जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥ १ ॥ सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥ २ ॥ नाइकें वचन बोलतां या लोकां । ह्मणे जालों तुका हरिरता ॥ ३ ॥
लोक मला वाटेल ते म्हणोत, बदफैली म्हणोत - तरी मी या वनमाळीला विसरणार नाही. लोकलाजेची, इभ्रतीची पर्वा सोडून मी आता निरपेक्ष झाले आहे; जगण्या-मरण्याचीही भीती किंवा आशा उरलेली नाही. लोक काहीही बोलले तरी मी त्यांचं ऐकत नाही - तुकाराम म्हणतात, मी पूर्णपणे हरीमय झाले आहे.
pocketpage.in