Abhang 95
गेली वीरश्री । मग त्यासि रांड मारी ॥१॥ ॥ध्रु.॥ मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥२॥ भंगलिया चित्ता । न ये कांहींनें सांधितां ॥३॥ तुका ह्मणे धीर । भंगलिया पाठीं किर ॥४॥
एकदा मनातली वीरश्री - धाडसाची उभारी - निघून गेली, की मग माणसाला कुणीही सहज हरवू शकते. एकदा गेलेली ती शक्ती परत आणण्याचा प्रयत्न केला तरी ती पूर्वीसारखी परत येत नाही. एकदा मन तुटले-मोडले, की मग ते कशानेही परत सांधता-जोडता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा धीर खचला की तो पुन्हा पूर्वीसारखा भक्कम होणे फार कठीण असते.
pocketpage.in