Abhang 1017
लक्ष्मीवळभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१॥ ॥ध्रु.॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥२॥ तुका ह्मणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥३॥
हे लक्ष्मीपती, हे दीनानाथा, हे पद्मनाभा. खरे सुख तुझ्या चरणीच आहे, मला त्याच ठिकाणी ठेव. माझी ही छोटीशी इच्छा आहे - तू तर उदारांचा राजा आहेस, ही पुरी करणे तुला अवघड नाही. तुकाराम महाराज म्हणतात - भोगांनी मला फार पीडा दिली आहे, तेव्हा तू वेगाने धावत ये.
pocketpage.in