Abhang 1028
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हा चि मज ॥१॥ नवविधा काय बोलिली जे भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥ तुका ह्मणे तुमच्या पायांच्या आधारें । उतरेन खरें भवनदी ॥३॥
मला तुमच्या दासांचा दास करून ठेवा - मला एवढाच आशीर्वाद द्या. जी नवविधा भक्ती सांगितली आहे, ती हे संतजनहो, माझ्या हातून घडू द्या. तुकाराम महाराज म्हणतात - तुमच्या पायांच्या आधारानेच मी खरोखर हा भवसागर पार करेन.
pocketpage.in