Abhang 1059
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तेंही होतें ॥१॥ ॥ ध्रु. ॥ माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥२॥ व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥३॥ तुका ह्मणे लाहान मोठा । सांड ताठा हा देवा ॥४॥
सगळ्यांची घोंगडी एकत्र करून एक ढीग रचला होता, त्यातच माझेही घोंगडे होते. आता माझ्या घोंगड्याचा माग दाखव, आणि हा जो गुंता झाला आहे तो उलगडू दे. असे व्हावे की माझी ही वासनारूपी संतती पार खुंटून जावी; तुझ्यापाशी मी अशी शपथच घेईन. तुका म्हणतो, हे देवा, लहान-मोठेपणाचा हा ताठा (अहंकार) आता सोडून दे.
pocketpage.in