Abhang 1094
माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हायेली ॥१॥ ॥ ध्रु. ॥ कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥२॥ केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥३॥ तुका ह्मणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥४॥
माझी विठ्ठल माउली प्रेमाने भरून तिला पान्हा फुटला आहे. ती मला जवळ घेऊन कुरवाळते, स्तनाला लावते, आणि जवळून कधी दूरही जात नाही. माझे सगळे हट्ट, लाड ती पुरवते; ती काही निष्ठुर नाही, उलट अगदी कोवळी, मायाळू आहे. तुका म्हणतो, ती माझ्या तोंडात ब्रह्मरसाचाच घास भरवते आहे.
pocketpage.in