Abhang 1115
वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे ॥१॥ ॥ध्रु.॥ करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥२॥ क्षमा दया शांति । बाण अभंग हे हातीं ॥३॥ तुका ह्मणे बळी । ते चि एक भूमंडळीं ॥४॥
विठ्ठलाचे वीर योद्धे खरोखर कणखर असतात, त्यांच्यापुढे काळसुद्धा पाय धरतो, शरण येतो. ते जयजयकाराचा घोष करतात, आणि त्यांच्या पापांचे डोंगरच्या डोंगर जळून जातात. क्षमा, दया आणि शांती हे अभेद्य बाणच जणू त्यांच्या हातात आहेत. तुका म्हणतो, हेच खरे बलवान वीर या पृथ्वीतलावर आहेत.
pocketpage.in