Abhang 1120
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥ ॥ध्रु.॥ काय करावें प्रमाण । तुह्मी सांगा संतजन ॥२॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥३॥ तुका ह्मणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥४॥
सोन्याचा कळस आहे, पण आत मात्र दारू भरलेली आहे. आता यात काय खरं प्रमाण मानावं, हे तुम्हीच सांगा, हे संतजनहो. मातीचं मडकं आहे, पण त्यात अमृताचा साठा भरलेला आहे. तुका म्हणतो, यातलं खरं हित कशात आहे, ते मला लवकर सांगा.
pocketpage.in