Abhang 1198
या चि हाका तुझे द्वारीं । सदा देखों तृष्णकरी ॥१ ॥ ॥ध्रु.॥ सदा करिती खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥२॥ सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥३॥ एके एक बुझाविसी । तुका ह्मणे ठक होसी ॥४॥
तुझ्या दारात मी सतत अशाच हाका मारत, आशाळभूतपणे तहानलेला उभा असतो. तुझे द्वारपाल सतत अडथळे आणतात, खंडणी मागतात; देवा, तू तर खरोखर भलताच हलकट आहेस! तू मात्र मजेत भोजन करत बसतोस, स्वतःला - माझ्यापासून - लपवून ठेवतोस. प्रत्येकाला वेगवेगळी आश्वासने देऊन फसवत राहतोस; तुका म्हणतो, तू अगदी खरा लबाड-ठक आहेस.
pocketpage.in