Abhang 1255
रिद्धिसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥ ॥ ध्रु. ॥ लोडें वालिस्तें पलंग सुपति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥२॥ पुसाल तरि आह्मां वैकुंठींचा वास | परि नाहीं राह्यास ठाव कोठें ॥३॥ तुका ह्मणे आह्मी राजे त्रेलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणें पुरें ॥४॥
ऋद्धी-सिद्धी घरी दासी आहेत, कामधेनू घरात आहे, पण खायला भाकरी नाही. गाद्या-गिरद्या, मऊ पलंग आहे, पण नेसायला लंगोटीसुद्धा नाही. विचाराल तर आमचे घर वैकुंठात आहे, पण राहायला कुठेच जागा नाही. तुकाराम म्हणतात, आम्ही तिन्ही लोकांचे राजे आहोत, पण कुणाचेच काही कमी-जास्त हिशोब नाही.
pocketpage.in