Abhang 1260
आली सलगी पायांपाशीं । होइल तैसी करीन ॥१॥॥ ध्रु. ॥ आणीक आह्लीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥२॥ अवघ्या निरोपणा भाव । हा चि ठाव उरलासे ॥३॥ तुका ह्मणे पाळीं लळे । कृपाळुवे विठ्ठले॥४॥
पायांजवळ सलगी (जवळीक) आली आहे, आता जमेल तसे करेन. आणखी कुठे जाऊ, इथेच माझा जीव ओवाळून टाकला आहे. माझे सगळे सांगणे-बोलणे एवढ्याच भावात उरले आहे. तुकाराम म्हणतात, हे कृपाळू विठ्ठला, माझे लाड पुरव.
pocketpage.in