Abhang 1263
देह नव्हे मी हें सरे | उरला उरे विठ्ठल ॥१॥ ॥ ध्रु. ॥ ह्मणऊनि लाहो करा | काळ सारा चिंतनें ॥२॥ पाळणाची नाहीं चिंता | ठाव रिता देवाचा ॥३॥ तुका ह्मणे जीवासाटीं । देव पोटीं पडेल ॥४॥
मी देह नाही, हे भान संपले की उरतो तो फक्त विठ्ठलच उरतो. म्हणून वेळ साधा, सगळा काळ चिंतनातच घालवा. पालनपोषणाची चिंता नाही, देवाची जागा रिकामीच आहे. तुकाराम म्हणतात, जिवासाठी देव आपोआप अंतःकरणात येऊन बसेल.
pocketpage.in