Abhang 1267
मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता ॥१॥ ॥ ध्रु. ॥ घडे कासयानें सेवा । सांग ब्रह्मांडाच्या जीवा ॥२॥ सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥३॥ तुका ह्मणे भावें । हरण ह्मणवितां वरवें ॥४॥
संतांची सेवा करायला गेले तरी ती योग्य प्रकारे जमत नाही. मग कोणत्या बळावर सेवा घडेल? सांग, हे ब्रह्मांडाच्या जीवा (परमात्म्या). समुद्रच समुद्रात सामावतो, तेव्हा त्यात मोठेपणा तो कुठला उरतो? तुकाराम म्हणतात, मनापासून स्वतःचा उद्धार करवून घेणे हेच खरे चांगले.
pocketpage.in