Abhang 1272
देवावरिल भार । काढूं नये कांहीं पर ॥१॥ ॥ ध्रु. ॥ तानभुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥२॥ देखावी निश्चिती । ते चि अंतर श्रीपती ॥३॥ वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥४॥
देवावर सगळा भार टाकलेला असताना, त्यातून काही वेगळे काढून घेऊ नये. भूक-तहानेची जाणीव होईल तेवढेच चिंतन चांगले. निश्चितपणे हेच पाहावे - अंतरंगातच श्रीपती (देव) आहे. सगळे वैभव तुकाराम विटाळासारखे, त्याज्य मानतो.
pocketpage.in