Abhang 1284
नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगे येऊनियां ॥१॥ ॥ ध्रु. ॥ सांगितळें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥२॥ माप टाकी सळ धरिली विठ्ठले । थापटोनि केलें सावधान ॥३॥ प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरळे शेवटीं लावी तुका ॥४॥
नामदेवांनी स्वप्नात मला जागे केले, सोबत पांडुरंगही आले होते. त्यांनी सांगितले - काव्यरचनेचे काम तू कर, उगाच सबब सांगत बसू नकोस. विठ्ठलाने निश्चय धरून मला थोपटून सावध, जागृत केले. त्यांनी शंभर कोटी अभंगांचे प्रमाण सांगितले; ती उरलेली जबाबदारी शेवटी तुकारामावरच सोपवली.
pocketpage.in