Abhang 1363
भावबळें विष्णुदास । नाहीं नाश पावत ॥१॥ योगभाग्यें घरा येती । सर्व शक्ति चालत ॥ध्रु.॥ पित्याचे जें काय धन । पुत्रा कोण वंचील ॥२॥ तुका ह्मणे कडे बैसों । तेणें असों निर्भर ॥३॥
श्रद्धेच्या बळावर विष्णुभक्ताचा कधीच नाश होत नाही. चांगल्या भाग्ययोगाने सर्व शक्ती आपणहून घरी चालत येतात. बापाचे जे धन असते, त्यापासून मुलाला कोण वंचित ठेवील? तुकाराम म्हणतात, आम्ही देवाच्या कुशीत जाऊन बसू, आणि त्यामुळे निर्धास्त राहू.
pocketpage.in