Abhang 1382
खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरी ॥१॥ ऐसे फुकाचे उपाय । सांडूनियां वांयां जाय ॥ध्रु.॥ परउपकार । एका वचनाचा फार ॥२॥ तुका ह्मणे मळ । मनें सांडितां शीतळ ॥३॥
माणूस खरे बोलला तरच फुकटातसुद्धा, विनासायास हरी मिळतो. असे फुकटचे सोपे उपाय सोडून देऊन माणूस उगाच वाया जातो. एका चांगल्या शब्दातूनही खूप मोठा परोपकार होऊ शकतो. तुकाराम म्हणतात, मनातला मळ (विकार) सोडून दिला की मन शीतळ (शांत) होते.
pocketpage.in