Abhang 1397
चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावें ॥१॥ सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ ॥ध्रु.॥ पढिये सर्वोत्तम भाव । येथें वाव पसारा ॥२॥ ऐसें उपदेशी तुका । अवघ्या लोकां सकळां ॥३॥
परमेश्वराचे चिंतन करायला विशिष्ट वेळ लागत नाही; ते सदासर्वकाळ करावे. ज्या मुखात सदैव 'नारायण' हे नाव असते, तेच मुख खरे मंगलमय होय. इथे सर्वोत्तम भावच प्रिय असतो; बाकी सगळा बडेजाव व्यर्थच आहे. तुकाराम असा उपदेश सर्व लोकांना करतात.
pocketpage.in