Abhang 1404
आणीक कांही मज नावडे मात । एका पंढरिनाथावांचूनियां ॥१॥ त्याची च कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवण गोड लागे ॥२॥ तुका ह्मणे संत ह्मणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनी कांहीं ॥३॥
पंढरीच्या नाथाशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट मला आवडत नाही. त्याचीच कथा, त्याचेच कीर्तन मला आवडते, ते ऐकायला गोड वाटते. तुकाराम म्हणतात, संत वाटेल ते म्हणोत, मला विठ्ठलाशिवाय दुसरे काही मनात नको.
pocketpage.in