Abhang 1451
सोंगे छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥१॥ ॥ध्रु.॥ सारा अवघें गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥ शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥२॥ तुका ह्मणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥
सोंगं करून, ढोंग करून देव भेटत नाही. हा सगळा गोंधळ आहे, जणू डोळ्यांवर पडदाच आला आहे. मनापासून खरी भक्ती नसेल, तर जे जे केलं जातं ते सगळं नुसतं कष्ट ठरतं. तुकाराम महाराज म्हणतात - लोकांना हे कळतं, तरी ते आंधळेच राहतात.
pocketpage.in