Abhang 1455
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥१॥ ॥ध्रु.॥ तुह्मी सांभाळिलों संतीं । भय निवारली खंती ॥ कृतकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥२॥ तुका ह्मणे काळें । आतां करूं न सके बळ ॥३॥
मी जन्माला आलो त्याचं खरं फळ आज मिळालं. हे संतांनो, तुम्हीच माझा सांभाळ केला, माझी भीती आणि चिंता दूर केली. माझं जीवन सार्थक झालं, जी इच्छा केली होती ती पूर्ण झाली. तुकाराम म्हणतात - आता काळालाही (मृत्यूलाही) माझ्यावर जोर चालणार नाही.
pocketpage.in