Abhang 1456
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥१॥ ॥ध्रु.॥ तुह्मी जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥२॥ तुका ह्मणे नेणें । काय केलें नारायणें ॥३॥
केवढं पुण्य असेल की ते आकाशाला भेदून गेलं (एवढं मोठं पुण्य होतं)! हे देवा/संतांनो, तुम्ही माझ्यावर कृपा केलीत, माझा सांभाळ केलात. किती पुण्यसंचय ओघळून आला हे मला कळतही नाही, ते अगणित आहे. तुकाराम म्हणतात - नारायणाने माझ्यासाठी काय काय केलं हे मलाही नीट कळत नाही.
pocketpage.in