Abhang 1457
असें येथींचिया दीनें । भाग्यहीन सकळां ॥१॥ ॥ध्रु.॥ भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ आणिक तें दुजे कांहीं । मज नाहीं यावरी ॥२॥ तुका ह्मणे केला कोणें । एवढा नेणें लौकिक ॥३॥
मी या जगातला सर्वात गरीब आणि कमनशिबी माणूस आहे. माझ्या गाठीशी एवढीच पुंजी आहे - मी नाम कंठाशी धरून ठेवलं आहे (सतत नामस्मरण करतो). याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीही नाही. तुकाराम म्हणतात - मला एवढी मोठी कीर्ती कोणी दिली हे मलाच कळत नाही.
pocketpage.in