Abhang 1458
गायें नाचें वाजे टाळी । साधन कळीं उत्तम हें ॥१॥ ॥ध्रु.॥ काय जाणों तरले किती । नावें ऐशा या बैसतां ॥ सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥२॥ तुका ह्मणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥३॥
गाणं, नाचणं, टाळ्या वाजवणं - कलियुगात हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. अशा नामरूपी नावेत बसून किती जण तरले हे कुणास ठाऊक. विठोबाचं नाम घेण्यासाठी कुठलेही कष्ट करावे लागत नाहीत. तुकाराम म्हणतात - शेवटच्या क्षणी (मृत्युसमयी) खरं उपयोगी पडणारं शस्त्र हेच एक आहे.
pocketpage.in