Abhang 1475
ज्याचा ऐसा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥१॥ ॥ध्रु.॥ देव तया जवळी असे । पाप नासे दर्शने ॥ कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाळी समता ॥२॥ तुका ह्मणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥३॥
ज्याला असा अनुभव आलाय की हे संपूर्ण विश्वच खरोखर देवरूप आहे, देव त्याच्या जवळच असतो, त्याच्या नुसत्या दर्शनानेही पाप नाहीसं होतं. त्याच्या ठायी काम-क्रोधाला थारा नसतो, तो सर्व प्राणिमात्रांकडे समानतेने पाहतो. तुकाराम म्हणतात - भेद आहे की अभेद, हा सगळा वादच त्याच्यासाठी संपून जातो.
pocketpage.in