Abhang 1483
पापीं ह्मणो तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥ ॥ध्रु.॥ ऐशा विचाराचे घाळूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ एकवेळ जेणें पुत्राचा उद्देशु । घेतला त्याचें कैसें नेलें दुःख ॥२॥ तुका ह्मणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥३॥
मला पापी म्हणा हवं तर, तरी मी तुझेच पाय आठवतो - यापेक्षा मोठं माझं पुण्य ते काय असेल? असे विचार मनात कोंडून ठेवून, हे चक्रपाणी, तू झोपला आहेस का, माझ्याकडे दुर्लक्ष करतोयस का? ज्याने एकदा फक्त आपल्या मुलाला हाक मारण्याच्या निमित्ताने (नारायण) नाव घेतलं, त्याचं दुःखही कसं दूर झालं (हे तुला ठाऊकच आहे - अजामेळाची कथा). तुकाराम म्हणतात - हे वैकुंठनायका, तुझ्याच सेवकाला माझ्यासाठी एवढी चिंता कशाला हवी?
pocketpage.in