Abhang 1491
आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥१॥ ॥ध्रु.॥ यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ पसरूनि चोंची । वचनें हीं करुणेचीं ॥२॥ तुका ह्मणे बळी । आह्मी लडिबाळे आळीं ॥३॥
मी माझ्या स्वरात अशी गोड-मधुर साद घालीन. हे पांडुरंगा (माते), ये, ये, मला तुझ्या प्रेमाचा पान्हा दे. पिल्लासारखी चोच पसरून, ही करुणेची विनवणीची वचनं मी बोलतोय. तुकाराम म्हणतात - आम्ही जणू हट्टी, लाडावलेली बाळं आहोत, हट्टाने असा हेका धरून बसलो आहोत.
pocketpage.in