Abhang 1492
सकळिकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥ ॥ध्रु.॥ रूप दाखवीं रे आतां । सहस्रभुजांच्या मंडिता ॥ शंखचक्रपद्मगदा । गरुडासहित ये गोविंदा ॥२॥ तुका ह्मणे कान्हा । भूक लागली नयनां ॥३॥
तुला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कुणाचंच समाधान होणार नाही. हे देवा, आता ते तुझं सहस्रभुजांनी सजलेलं रूप मला दाखव. शंख, चक्र, पद्म, गदा घेऊन, गरुडावर बसून ये, गोविंदा. तुकाराम म्हणतात - हे कान्हा, माझ्या डोळ्यांना तुला पाहण्याची भूक लागली आहे.
pocketpage.in