Abhang 1493
पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥१॥ ॥ध्रु.॥ तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ ब्रह्मांडनायका । भक्तजनाच्या पाळका ॥२॥ जीवांचिया जीवा । तुका ह्मणे देवदेवा ॥३॥
हे पतितपावना, हे दीनानाथा, हे नारायणा! तुझं रूप माझ्या मनात राहो, माझी वाणी तुझं नाम जपत राहो. हे ब्रह्मांडनायका, हे भक्तांच्या पालनकर्त्या. हे सर्व जीवांच्या जीवनाधारा, तुकाराम म्हणतात - हे देवांच्या देवा!
pocketpage.in