Abhang 1494
करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥१॥ लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥ तुका ह्मणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥
हे मना, तू फक्त हेच एक काम कर - राम राम असा जप कर. हे मना, तुला हाच एक छंद लागू दे - गोविंद गोविंद म्हण. तुकाराम म्हणतात - हे मना, मी एक गरीब याचक आहे, मला एवढी भीक (ही एकच गोष्ट) दे.
pocketpage.in