Abhang 1500
विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥ ॥ध्रु.॥ आह्मां विठ्ठल जीवन । टाळ चिपळिया धन ॥ विठ्ठल हे वाणी । अमृत हे संजिवनी ॥२॥ रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥३॥
विठ्ठलाचं नाव मनात घोळवलं की गाताना फार गोड लागतं. आमच्यासाठी विठ्ठल हाच जीवनाधार आहे, टाळ-चिपळ्या हीच आमची संपत्ती आहे. विठ्ठल हा शब्द उच्चारणं हेच अमृत आहे, हीच संजीवनी आहे. याच भक्तिरंगात रंगून जाऊन तुकाराम सर्वांगाने जणू विठ्ठलरूपच होऊन गेले.
pocketpage.in