Abhang 508
पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥१॥ ॥ ध्रु. ॥ शेष घेऊनि जाईन । तुमचें जालिया भोजन ॥२॥ जालों एकसवा । तुझ्या आडुनियां देवा ॥३॥ तुका ह्मणे चित्त । करूनि राहिलों निश्चित ॥४॥
मी प्रसादाची वाट पाहतो आहे, ताट धुवून दे. तुझे जेवण झाले की उरलेला प्रसाद (शेष) घेऊन जाईन. हे देवा, तुझ्या आडोशाला राहून मी तुझ्याशी एकरूप झालो आहे. तुका म्हणतो, मन स्थिर करून मी निश्चिंत होऊन राहिलो आहे.
pocketpage.in