Abhang 510
कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥१॥ ॥ ध्रु. ॥ पीक पिकलें पिकळें । घन दाटोनियां ॥२॥ आलें शेवटींचें दान । भागा आला नारायण ॥३॥ तुका ह्मणे पोट । भरलें वारले बोभाट ॥४॥
डोक्यावर कळस वाहिला आहे, सहस्रनामांनी पूजा करतो. पीक भरपूर पिकले आहे, ढग दाटून आले आहेत. शेवटचे दान (शेवटचा वाटा) आला, नारायण माझ्या वाट्याला आला. तुका म्हणतो, पोट भरले, आता ओरडा-गोंधळ थांबला.
pocketpage.in