Abhang 516
कास घालोनी बळकट । झालों कळिकाळासी नीट । केळी पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥ ॥ ध्रु. ॥ या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी कामी गुंतळे रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥२॥ एकंदर शिका । पाठविला इहलोका । आलों ह्मणे तुका । मी नामाचा धारक ॥३॥
कंबर घट्ट बांधून मी काळालाही (मृत्यूलाही) सामोरा गेलो, संसाररूपी सागरावरून मी पायवाट काढली. या रे या रे, लहान-थोर, कोणत्याही जातीचे स्त्री-पुरुष सगळे या, नीट विचार करा, कोणीही चिंता करू नका. जे व्यर्थ कामांत गुंतलेले आहेत किंवा रिकामे बसले आहेत, जप करणारे-तप करणारे, मुक्त आणि मुमुक्षू (मोक्षाची इच्छा करणारे) - सगळ्यांसाठी हा नगारा वाजवला आहे. थोडक्यात एवढेच शिका - तुका म्हणतो, मी याच जगात नामाचा प्रसार करण्यासाठी पाठवला गेलो आहे.
pocketpage.in