Abhang 521
पराविया नारी रखुमाईसमान । हें गेळें नेमून ठायींचें चि ॥१॥ ॥ ध्रु. ॥ जाई वो तूं माते न करीं सायास । आह्मी विष्णुदास नव्हों तैसे ॥२॥ न साहावें मज तुझे हे पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥३॥ तुका ह्मणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाळे ॥४॥
दुसऱ्याची स्त्री ही रखुमाईसमान (आईसमान) मानावी, हा नियम मी आधीपासूनच ठरवून टाकला आहे. हे माते, तू (मोहवणारी) निघून जा, प्रयत्न करू नकोस, आम्ही विष्णूचे दास तसे (असे वागणारे) नाही. तुझे हे अधःपतन मला सहन होणार नाही, असे वाईट बोलणे बोलू नकोस. तुका म्हणतो, तुला जर पती हवा असेल, तर या जगात पुरुषांची काय कमी आहे?
pocketpage.in