Abhang 528
न लगे हें मज तुझें ब्रह्मज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥ ॥ ध्रु. ॥ लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥२॥ जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं ही ॥३॥ तुका ह्मणे नको रागेजों विठ्ठला । उठीं देई मला भेटी आतां ॥४॥
मला तुझे ब्रह्मज्ञान नको, तुझे गोजिरे सगुण रूपच पुरे आहे. हे पतितपावना, तुला यायला उशीर झाला, तू दिलेला शब्द विसरून गेलास. संसार जाळून मी अंगणात बसलो आहे, तरी तुझ्या मनात, मानसातही माझी आठवण नाही. तुका म्हणतो, हे विठ्ठला, रागावू नकोस, ऊठ आणि आता मला भेट दे.
pocketpage.in