Abhang 534
अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळां येतें ॥१॥ ॥ ध्रु. ॥ जाळूं नयें नाव पावळेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥ तुका ह्मणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥३॥
ज्याचा जसा अधिकार तसा मार्ग दाखवला जातो, त्या मार्गाने चालताना पुढे सगळे उमगत जाते. अजून पैलतीर गाठलेला नसतानाच नाव जाळू नये, तिच्यावर मागून येणाऱ्या पुष्कळ लोकांचाही आधार असतो. तुका म्हणतो, रोग वैद्याच्याच अंगात राहिला, तर त्याचा जगाला काय उपयोग होणार?
pocketpage.in