Abhang 548
पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥१॥ ॥ ध्रु. ॥ अर्थी परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥२॥ देवाचीं चरित्रे दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥३॥ तुका ह्मणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखाचि ॥४॥
पोट भरण्यासाठी सोंग करणाऱ्यांच्या नादी लागू नये, कारण त्यांचे सगळे भेद शेवटी विषयांतच गुंतलेले असतात. लोभी मनाला खरा परमार्थ कसा साधणार? भिकेच्या हव्यासापायी केलेले सोंग व्यर्थच असते. देवाच्या लीला-चरित्रे दाखवून हे लोक आपल्या लाघवी कलांनी लोकांना मोहात पाडतात. तुका म्हणतो, ज्याच्या मनात अभिलाषा (हाव) राहते, फसवणारा आणि फसणारा दोघांनाही सारखाच नरकवास मिळतो.
pocketpage.in