Abhang 549
भुंकती तीं द्यावी भुंको । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥ ॥ ध्रु. ॥ भाविकांनी दुर्जनारचें । मानूं नये कांहीं साचें ॥२॥ होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥३॥ तुका ह्मणे त्यांचे । पाप नाहीं ताडणारचें ॥४॥
कुत्री भुंकत असतात, त्यांना भुंकू द्यावे, आपण मात्र त्यांचे अनुकरण करू नये. दुर्जनांचे बोलणे भाविक माणसांनी खरे मानू नये. जेवढी ताकद असेल तेवढी त्या दुष्टांची फजिती करावी. तुका म्हणतो, अशा टीकाकारांच्या टोमण्यांचे कुठलेही पाप (त्याचा परिणाम) आपल्याला लागत नाही.
pocketpage.in