Abhang 558
दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥ ॥ध्रु.॥ विष्णुदास आह्मी न भ्यों कळिकाळा । भुलों मृगजळा न घेडे तें ॥ उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥२॥ तुका ह्मणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगेंचि ॥३॥
दिवा हातात घेऊन अंधार शोधण्यासारखा हा चमत्कारिक प्रकार आहे. आम्ही विष्णुभक्त काळालाही भीत नाही, मृगजळाला आम्ही फसत नाही. धूळ उडवली की सूर्याची तेजस्विता मलूल दिसते - हे कमनशिबी लोकांना का कळत नाही, कोण जाणे. तुकाराम म्हणतात, गवताने विस्तव झाकून टाकता येतो असे म्हणणे व्यर्थच आहे.
pocketpage.in