Abhang 562
काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥१॥ ॥ध्रु.॥ किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरीं ॥ झवे आपुली आई काय माझे केलें । धड या विठ्ठले संसाराचें ॥२॥ तुका ह्मणे येती बाईले असडे । फुंदोनियां रडे हांसे कांहीं ॥३॥
कोण जाणे, कुणी वैरी मेला होता, त्यानेच जणू सूड उगवला आणि माझ्या मानगुटीवर बसला. हे दुःख किती काळ सोसायचे, किती लोकांपुढे तोंड वासून मागायचे? अरे यायला! काय केले माझे, या विठ्ठलाने तरी हा संसार नीट लावला का? तुकाराम म्हणतात, बायकोला मग झटके येतात, ती हुंदके देऊन रडते, कधी थोडी हसतेही.
pocketpage.in