Abhang 565
वरें जालें गेलें । आजी अवघें मिळालें ॥१॥ ॥ध्रु.॥ आतां खाईन पोटभरी । ओल्या कोरड्या भाकरी ॥ किती तरी तोंड । याज्ञीं वाजवूं मी रांड ॥२॥ तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥३॥
बरं झालं, आज सगळं एकत्र जमून आलं. आता पोटभर खाईन, ओली असो नाहीतर कोरडी, कशीही भाकरी चालेल. याच्या या देवभक्तीपायी किती दिवस मी तोंड वाजवत बसू, बाई? तुकारामांनी बायकोची समजूत घातली, गोड बोलून तिला शांत केले.
pocketpage.in