Abhang 574
अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥१॥ ॥ध्रु.॥ ह्मणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ ऊंस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥२॥ तुका ह्मणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥३॥
सगळ्यांनाच देव मिळवता येऊ शकतो, पण त्यांच्या अंगच्या दुर्गुणांचाच अडथळा येतो. म्हणून सगळे सारखे असू शकत नाहीत, एक दुसऱ्यापासून खूप दूरच राहतो. ऊस आणि कांदा एकाच वाफ्यात लावले तरी दोघांची गोडी अगदी वेगळी असते. तुकाराम म्हणतात, विष आणि अमृत यांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही.
pocketpage.in