Abhang 585
वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥ ॥ध्रु.॥ जिकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥२॥ तुका ह्मणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥३॥
आनंदाच्या गजरात तुताऱ्या वाजतील. अहंकारावर विजय मिळवून त्याचेच डोके पायाखाली तुडवले. आता काळाचा काही वचक उरत नाही, आणखी कष्ट करायची गरजच काय? तुकाराम म्हणतात, आता वैकुंठाला जाणे अगदी सोपे झाले आहे.
pocketpage.in