Abhang 595
सुखें बोले ब्रह्मज्ञान । मनीं धनअभिमान ॥१॥ ॥ध्रु.॥ ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ॥ पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥२॥ विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥
ब्रह्मज्ञानाच्या गप्पा सहज मारतो, पण मनात मात्र धनाचाच अभिमान असतो. अशा माणसाची सेवा केली तर जिवाला काय सुख मिळणार? पोटासाठी अशा प्रकारचे अनेक 'संत' या कलियुगात निर्माण झाले आहेत. पण खरा संत क्वचितच भेटतो, तुकाराम अशा माणसाला लोटांगण घालतात.
pocketpage.in