Abhang 600
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥ ॥ध्रु.॥ वृत्ति राखा पायांपासीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥२॥ तुका ह्मणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥३॥
हे नारायणा, माझ्या दुःखाचा नायनाट कर. माझी वृत्ती तुझ्या पायांपाशीच राख, माझ्या मनात कायमची वस्ती कर. माझे लाड पुरवून आता मला फळाला पोचव. तुकाराम म्हणतात, दीनांचा शीण देवच दूर करतो.
pocketpage.in