Abhang 704
सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥ ॥ ध्रु. ॥ त्यांची सरली बेरझार । जाला सफळ व्यापार ॥२॥ हरी आला हाता । मग कैंचीं भय चिंता ॥३॥ तुका ह्मणे हरी । कांहीं उरो नेदी उरी ॥४॥
ज्यांनी हरीला आपल्या हृदयमंदिरात साठवून ठेवलं आहे, त्यांची जीवनातली धावपळ, तगमग संपते; त्यांचा जीवनव्यवहार यशस्वी होतो. एकदा हरी हाती आला, की मग भीती किंवा काळजी कशाची? तुकाराम महाराज म्हणतात, हरी काहीही अपुरं ठेवत नाही - तो सर्व काही पूर्ण करतो.
pocketpage.in