Abhang 713
नसे तरी मनीं नसो । परी वाचे तरी वसो ॥१॥ ॥ ध्रु. ॥ देह पडो या चिंतने । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥२॥ दंभस्थिती भलत्या भावें । मज हरिजन ह्मणावें ॥३॥ तुका ह्मणे काळें तरी । मज सांभाळील हरी ॥४॥
मनात जरी भाव नसला, तरी निदान वाणीने तरी नामस्मरण होत राहावं. विठ्ठलाचं नाव घेत घेतच माझा देह पडावा (मरण यावं). जरी माझ्यात ढोंग असलं, कशाही भावाने असो, पण लोकांनी मला हरिभक्त म्हणावं इतकंच. तुकाराम महाराज म्हणतात, पुढे काळाने का होईना, हरी माझी काळजी घेईलच.
pocketpage.in