Abhang 728
बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥१॥ ॥ ध्रु. ॥ नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥२॥ आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥३॥ तुका ह्मणे दोषी । मी तों पातकांची राशी ॥४॥
मी संसारसागरात बुडतो आहे, मला सावर, वाचव. माझ्या पापांचे डोंगर पाहून त्याचं ओझं समजू नकोस. जे तुझं आहे ते तूच सांभाळ - नाहीतर तुझी ओळखच (ब्रीद) कशी राहील? तुकाराम महाराज म्हणतात, मी मोठा पापी आहे, मी तर नुसता पापांचा ढीगच आहे.
pocketpage.in