Abhang 736
वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥१॥ ॥ ध्रु. ॥ तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥२॥ गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥३॥ तुका ह्मणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥४॥
आता मी सर्व प्राणिमात्रांना वंदन करीन, कुणालाही वगळणार नाही. हे नारायणा, पावलोपावली मला तुझंच अस्तित्व जाणवत राहील. सगळे भेदभाव विसर्जित करणं हेच खऱ्या वेदांचं सांगणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असं झालं की मग दुजाभावाची संगतच उरत नाही.
pocketpage.in